त्रिपुरात चार बांगलादेशींना अटक   

आगरतळा : भारतात अवैधरित्या प्रवेश केल्याप्रकरणी सुरक्षा दलांनी आगरतळा रेल्वे स्थानकावरून चार बांगलादेशी नागरिकांना अटक केली. या बांगलादेशी नागरिकांना घुसखोरी करण्यास मदत केल्याच्या आरोपाखाली त्रिपुरातील आणखी  पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
 
या चार बांगलादेशी नागरिकांना शनिवारी कोलकात्याला जाणार्‍या रेल्वेमध्ये चढत असताना ताब्यात घेण्यात आले. भारतात येण्यासाठी कोणतीही वैध कागदपत्रे सादर न केल्यामुळे नंतर त्यांना अटक करण्यात आली. येथील स्थानिक न्यायालयात हजर केल्यानंतर चौकशीसाठी त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

Related Articles